स्वारगेट ते विश्रांतवाडीदरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करणार्‍या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा कंडक्टरने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन गोडगे असे आरोपी कंडक्टरचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी काल दुपारी स्वारगेट ते विश्रांतवाडीदरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होती. त्यावेळी आरोपी कंडक्टर प्रशांत किसन गोडगे तिच्या बाजूला थांबून मोठ्या आवाजात म्हणाला की, “तुला बाजूला उभा राहण्यास जागा नाही का?” यावर ती तरुणी काहीच बोलली नाही आणि बाजूला उभी राहिली.

त्यानंतर काही वेळाने बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे या तरुणीने आरोपीबाबत तक्रार केली. याबद्दलचा राग मनात धरून आरोपीने तरुणीच्या बाजूला उभा राहीला आणि या तरुणीच्या कमरेला हात लावला. हा प्रकार आरोपीने तीन वेळा केला. या घटनेबाबत १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तातडीने पीएमपीएमएल बसच्या या कंडक्टरला अटक केली असून अधिक तपास करण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmpml conductor molest 17 year old girl svk 88 scsg