पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या बडतर्फ बसचालकांनी पिंपरी चिंचवडच्या महापौरांची भेट घेतली. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी केलेली बडतर्फीची कारवाई अयोग्य असल्याची तक्रार यावेळी बसचालकांनी महापौर नितीन काळजे यांच्यासमोर मांडली. नोकरीवर पुन्हा रुजू करावे यासाठी चालकांनी महापौर आणि पीएमपीएमएलचे संचालक काळजे यांना साकडे घातले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या अनेक वर्षांपासून या १५८ बदली चालकांना वेळेवर बदली मिळत होती. मात्र तुकाराम मुंढे आल्यापासून काम मिळणे बंद झाले आणि उलट त्यांनीच गैरहजेरीचा ठपका ठेवला, असा आरोप चालकांनी केलाय. तर महापौर काळजे यांनी देखील प्रशासनाच्या चुकीचे चालकांना बळी ठरवू नये अशी मागणी केली. याविषयी बैठक घेऊन तुकाराम मुंढे याना पत्र देणार असल्याचे यावेळी सांगितले.