पिंपरी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ॲक्शन मोडवर आले आहे. अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस दिल्यानंतरही बांधकाम सुरू ठेवल्याप्रकरणी गहूंजे येथील दोघांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदाराम चौधरी (रा. गहूंजे, ता. मावळ), दीपक कुमार सहानी (रा. गहूंजे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीएचे) कनिष्ठ अभियंता गणेश जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…लाडकी बहीण योजनेतील पैसे वाटपाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक, हडपसर भागातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदाराम चौधरी यांना पीएमआरडीएने अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती. तिचे पालन न करता चौधरी यांनी चार मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक कुमार सहानी यांना देखील पीएमआरडीएने अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती. तिचे पालन न करता सहानी यांनी चार मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले. याबाबत त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

हेही वाचा…पिंपरी : तोतया पोलीस, मनी लाँड्रिंगची भीती आणि महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पीएमआरडीए हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता संपताच प्रशासनाने या बांधकामांवर कारवाईचा हातोडा उगारण्यास सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकाम धारकांना बांधकाम काढून घेण्याबाबत नोटिसा दिल्या जात आहेत. त्यानंतरही बांधकाम सुरू ठेवल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmrda has come into action mode as soon as code of conduct after assembly elections is over pune print news ggy 03 sud 02