पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावर पुणेरी मेट्रोचे काम सुरू आहे. आता या कामात गणेशखिंड रस्त्यावरील दोन मेट्रो स्थानकांवरून तिढा निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँक कार्यालय आणि वेधशाळेसमोरील शिवाजीनगर या दोन स्थानकांचे प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे जिने कुठे असावेत, असा वाद निर्माण झाला आहे. यामुळे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आमनेसामने आले आहेत.

गणेशखिंड रस्त्यावर रिझर्व्ह बँक कार्यालय आणि शिवाजीनगर ही पुणेरी मेट्रोची दोन स्थानके नियोजित आहेत. या स्थानकांचे काम सध्या सुरू आहे. पुणेरी मेट्रोचा हा प्रकल्प पीएमआरडीएकडून सार्वजनिक खासगी भागीदारीतून टाटा समूहासोबत सुरू आहे. या मेट्रो मार्गाचा प्रकल्प विकास आराखडा गणेशखिंड रस्त्याची रुंदी ३६ मीटर गृहित धरून करण्यात आला. नंतर या रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन झाले. त्यात रस्ता अरुंद होत असल्याने त्याची रुंदी ३६ वरून ४५ मीटर करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याची रुंदी ४५ मीटर करण्याचे पाऊल महापालिकेने उचलले. सुमारे दोन वर्षांनंतर भूसंपादन पूर्ण होऊन आता हे रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण होत आले आहे.

Impact on Konkan Railway due to block at CSMT Mumbai news
सीएसएमटी येथील ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवर परिणाम
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
vasai accident
वसई: महामार्गावरील सिमेंट कॉंक्रिटीकरणाचे सदोष काम, तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू
old pune mumbai highway accident
जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर भीषण अपघात, चालक गंभीर
Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
Water Leakage in Mumbai Metro after heavy rain
Water Leakage in Mumbai Metro : मेट्रो ७ मार्गिकेवरील स्थानकात गळती, प्रवाशांकडून नाराजी व्यक्त; प्रशासन म्हणाले…
Singapore Trains
Singapore Railway : सिंगापूरचं मुंबई: पावसामुळे रेल्वेसेवा कोलमडली; पण प्रवाशांसाठी ‘या’ सुविधाही पुरवल्या!
mumbai heavy rain local down
“माझ्या बाळाला जेवण भरवायचं आहे, प्लीज लोकल सुरू करा”, स्टेशनवर खोळंबलेल्या महिला प्रवाशाची मोटरमनला कळकळीची विनंती!

हेही वाचा – शाळकरी मुलीला धमकावून बलात्कार; सख्खे भाऊ अटकेत

मेट्रोच्या या दोन्ही स्थानकांचे प्रवेश करण्याचे आणि बाहेर पडण्याचे जिने ४५ मीटरच्या रस्त्याच्या आतमध्ये येत आहेत. यावर महापालिकेने पीएमआरडीएला पत्र पाठवून हे जिने ४५ मीटर रस्ता रिकामा ठेवून बाहेर घेण्यास सांगितले. मात्र, जिने बाहेर घ्यावयाचे झाल्यास आणखी भूसंपादन करावे लागणार आहे. एकंदरीत भूसंपादची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने आता स्थानकांचा उभारणीचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे या स्थानकांच्या जिन्याचे काम सध्या थांबविण्यात आले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल हे लवकरच बैठक घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

…तर प्रकल्पाला एक ते दीड वर्षे विलंब

महापालिकेने सांगितल्याप्रमाणे ४५ मीटर रस्त्याबाहेर मेट्रो स्थानकांचे जिने घ्यावयाचे झाल्यास रिझर्व्ह बँक, आकाशवाणी, वेधशाळा यासह इतर संस्थांची आणखी जागा घ्यावी लागेल. भूसंपादनाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने यामुळे प्रकल्पाला एक ते दीड वर्षाचा विलंब लागू शकतो. याचवेळी भूसंपादन झाले तरी स्थानकांचे जिने या संस्थांच्या मुख्य इमारतीला अगदी जवळ येतील. त्यामुळे या संस्थांच्या मुख्य इमारतीच्या अग्निशमन सुरक्षेला बाधा येईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – पुण्यातील अनेक प्रमुख रस्ते, फूटपाथवर वाहने पडून; महापालिका करणार ही कारवाई

रिझर्व्ह बँक आणि वेधशाळेसमोरील मेट्रो स्थानकांचे जिने ४५ मीटर रस्त्याच्या बाहेर असावेत, असे महापालिकेचे म्हणणे आहे. यासाठी अतिरिक्त भूसंपादन करावे लागेल. यावर पीएमआरडीए आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्यात लवकरच बैठक होऊन निर्णय घेतला जाईल. – रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

गणेश खिंड रस्त्याचा पुढील ५० वर्षांचा विचार करून वाहतूक नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकांचे जिने ४५ मीटर रुंदीच्या रस्त्याच्या आतमध्ये आल्यास तो अरूंद होईल. त्यामुळे आणखी भूसंपादन करूनही हे जिने बाहेरील बाजूस घेता येतील. – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका