पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची अडथळ्यांची शर्यत काही थांबण्याचे नाव नाही. या मेट्रो मार्गावरील गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणात दोन्ही बाजूला मेट्रो स्टेशनचे जिने, एलेव्हेटर करण्याला महापालिकेकडून विरोध होत आहे. तसेच या मेट्रोसाठी राज्यपालांचे पुण्यातील औंध रस्त्यावरील अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘राजभवन’ची जागा सुरक्षेच्या कारणास्तव मिळण्यातही अडचणी येत आहेत.

मेट्रो प्रकल्पात राजभवनच्या जागेत मेट्रो स्थानकाचा जिना येत असल्याने राजभवनची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. राजभवन राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असून औंध रस्त्यावर असणाऱ्या या निवासस्थानाला इंग्रजांच्या काळापासून ऐतिहासिक वारसा आहे. देशाचे राष्ट्रपती पुणे दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांचा मुक्काम राजभवनातच असतो. या कारणास्तव नकार कळविण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Dama experiment at Government Medical College in Yavatmal
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘डामा’चा प्रयोग, नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Nagpur Improvement Trust does not have funds for the road promised by Gadkari
गडकरींच्या वचननाम्यातील रस्त्यासाठी नासुप्रकडे निधी नाही?
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Mamata Banarjee
Kolkata Police Band : कोलकाता पोलीस बँडला राजभवनात प्रवेश नाकारला; प्रजासत्ताक दिनीच मुख्यमंत्र्यांची राज्यपालांसोबत खडाजंगी!
police arrest bangladeshi nationals residing illegally In dombivli kalyan
डोंबिवली, कल्याणमध्ये घुसखोर बांग्लादेशी नागरिक अटक
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’

हेही वाचा…. मुलांच्या जीवाशी खेळ! विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक

पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. ८० टक्के खांबाची उभारणीही पूर्ण झाली आहे. या मेट्रोसाठी औंध भागातील टायग्रीस कॅम्प, ग्रामीण पोलीस, शिवाजीनगर भागातील आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ आणि हवामान विभाग, आरबीआय व आकाशवाणी, न्यायालय वाहनतळ, सेण्ट्रल बी रिसर्च व ट्रेनिंग सेंटर, शासकीय तंत्रशिक्षण विभाग, पोलीस भरती मैदान, पोलीस रिक्रेशन हॉल, सीओईपी वसतिगृह, न्यायालय, कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय या जागा जवळपास मिळाल्या आहेत. राजभवनच्या जागेसाठी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त, नगररचना अशा विभागांच्या प्रमुखांची समिती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन जागेबाबत तोडगा काढण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

Story img Loader