लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विदिशा सांस्कृतिक मंचच्या वतीने ज्येष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांना यंदाचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सोमवारी (१० मार्च) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ढेरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विदिशा विचार मंचच्या संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी दिली.