शहरातील बिकट झालेला वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने पंधरा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तातडीने स्वतंत्र वाहतूक नियोजन अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी गटनेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा >>>पुणे : दिवाळी खरेदीसाठी झुंबड मध्यभागात कोंडी

यासंदर्भात आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाहतूक नियोजनासाठी ठोस कृती यापुढे करावी लागणार आहे. त्यासाठी वाहतूक नियोजनाचा बृहत आराखडा करणे क्रमप्राप्त आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावी पद्धतीने राबविल्यास वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळणे शक्य आहे.

हेही वाचा >>>लोणावळा : मावळातील शेतकऱ्यांकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी ; केंद्रीय कृषीमंत्र्यांंना विविध मागण्यांचे निवेदन

सध्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी अशा सर्वांचे हाल होत आहे. वेळेचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अरुंद रस्त्यांसह शहरातील सर्वच रस्त्यांवर चार चाकी वाहनांना पार्किंगला अटकाव घालणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांचे सुसूत्रीकरण करणे, अतिक्रमण विरहित फुटपाथ, रस्ता रुंदीतील जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे, प्रत्येक चौकात दोनशे मीटर अंतरावर गतिरोधक उभारणे, रस्त्यात बंद पडलेल्या वाहनांना घेऊन जाण्यासाठी क्रेनची व्यवस्था सक्षम करणे, चोवीस तास वाहतूक नियंत्रक दिवे सुरु ठेवण्यासाठी वीज बॅटरी बॅकअप यंत्रणा प्रभावी करणे, जिथे आवश्यक,त्या ठिकाणी एकेरी मार्गाची आखणी करणे, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वाहनतळांची निर्मिती करणे आदी विविध उपाययोजना करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आबा बागुल यांनी सांगितले.

Story img Loader