पुणे : बंदी घातलेल्या नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. लोहियानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सोहेल आरीफ शेख (रा. इनामकेमळा, लोहीयानगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : कैद्यांनी तयार केले देवघर, चौरंग; आता ई मार्केटप्लेसवरही मिळणार कारागृहातील उत्पादित वस्तू

हेही वाचा – भारतीय डॉक्टरने विकसित केले तोंडाच्या कर्करोगावरील औषध, जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून दखल

लोहियानगरमध्ये एकजण नायलाॅन मांजाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळाली. शेख याचे गोळ्या बिस्किटे विक्रीचे दुकान आहे. शेख नायलाॅन मांजाची विक्री करत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव, रमेश तापकीर, अमोल पवार, शशिकांत दरेकर आदींनी ही कारवाई केली.