बारामती : बेकायदा पद्धतीने गोवंश जातींचे मांस आणि काही जनावरे बाळगणाऱ्या बारामती मधील काही वक्ती वर पोलिसांनी कारवाई करुन पकडले आहे.त्यांच्या कडून गोमांस आणि काही जनावरे पण ताब्यात घेतल्याची महिती पोलिसांनी दिली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या महिती नुसार बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना बारामती मधील बातमीदारामार्फत गुप्तपणे मिळालेल्या महिती नुसार , बारामती शहरातील देवळे इस्टेट येथील माढा कॉलनी येथे काही व्यक्ती गोवंश जातीचे मांस व जिवंत जनावरे बेकायदा पद्धतीने जवळ ठेवलेलीआहेत,अश्या स्वरूपातील माहिती मिळाल्या वरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस अंमलदार तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाई मध्ये साधारण पणे १२०० किलो गोवंश जातीचे मांस तसेच दोन जर्सी गाई व दोन जर्सी वासरे तसेच तीन चार चाकी वाहने असा साधारण एकूण ६,४२,००० रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे,

या प्रकारणी एकूण सात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात येत असून यामध्ये आणखीन काही व्यक्तीची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी ठेवलेली दिसून येत आहे.

बारामती मधील ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,बारामती शहर पोलीस विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

Story img Loader