Pune Ganesh Visarjan: पुण्यात अल्पवयीन मुले, तरुणांनी कोयता घेऊन धमकावणे, हल्ले करणे अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यांत घडल्या आहे. शहरातील विविध भागातील कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. काही टोळ्यांवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोयता गँगबाबत जनजागृती करण्यासाठी वैभव मित्र मंडळाने थेट देखावाच साकारला होता. त्यात गणरायासह कोयता गँगला थेट आव्हान दिलेले पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांचे चित्र साकारण्यात आले होते. ‘एका कोयत्यामुळे आयुष्य बरबाद करू नका’ असा संदेश या देखाव्यावर लिहिण्यात आला होता तर दुसरीकडे ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवा मग दाखवतो तुम्हाला… बल्ले बल्ले’ असा मजकूर देखील देखाव्यावर लिहिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

व्हिडीओ पाहा :

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…