पुण्यात मध्यप्रदेशातून पिस्तुले आणून त्याची सराईत गुन्हेगारांना विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेने अटक केली. चौघांकडून देशी बनावटीच्या ११ पिस्तुलांसह १४ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे (वय २१, सध्या रा. शनीशिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर), निखिल उर्फ सनी बाळासाहेब पवार (वय २३, रा. लोणी काळभोर), युवराज बापू गुंड (वय २४, रा. पांडवनगर, वडकी गाव, सासवड रस्ता), अमोल नवनाथ तांबे (वय २७, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाघोलीतील केसनंद रस्त्यावर डुकरे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलीस कर्मचारी कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून डुकरेला पकडले. त्याच्याकडून तीन पिस्तुले आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली.

डुकरे याने मध्यप्रदेशातून पिस्तुले आणल्याची कबुली पोलिसांना दिली. पिस्तुलांची विक्री आरोपी पवार, गुंड, तांबे यांना केल्याची माहिती तपासात मिळाली. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तुले, काडतुसे जप्त करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ११ पिस्तुले, १४ काडतुसे जप्त केली. पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, प्रतीक लाहिगुड, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार आदींनी ही कारवाई केली.

मध्यप्रदेशातून शहरातील गुंड टोळ्यांना पिस्तुले

शहरातील गुंड टोळ्यांना मध्यप्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा होत असून एका पिस्तुलाची विक्री १० ते १५ हजार रुपयांना केली जात आहे. आरोपी ज्ञानेश्वर डुकरे मध्यप्रदेशातून पिस्तुले खरेदी करायचा. डुकरेने शंकर नायक नावाच्या व्यक्तीकडून पिस्तुले खरेदी केली आहेत. आरोपी पवार, गुंड, तांबे यांना त्याने पिस्तुलांची विक्री २० ते २५ हजार रुपयांना केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले.