पुण्यात वाढदिवसाचा केक भररस्त्यात कोयत्याने कापून दहशत माजविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. मुंढवा भागात ही घटना घडली. वीरेंद्र बाजीराव सस्ते (वय १८), शशांक श्रीकांत नागवेकर (वय १९), समीर विश्वजीत खंडाळे (वय २१, तिघे रा. केशवनगर, मुंढवा), सुखविंदरसिंग पप्पुसिंग टाक (वय १९, रा. हडपसर, गाडीतळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस कर्मचारी रमेश उगले यांनी या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी वीरेंद्र सस्ते याच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमावर समूह तयार करण्यात आला आहे. सस्ते आणि त्याचे साथीदार मुंढव्यातील केशवनगर भागात राजमाता जिजाऊ चौकात सायंकाळी जमले. सस्ते आणि साथीदारांनी भरस्त्यात कोयत्याने केक कापून दहशत माजविली.

हेही वाचा : पुण्यात पोपटाची पिले दाखविण्याचा बहाणा करत मित्राला ढकलले रेल्वे पुलावरून, जलपर्णीमुळे मुलगा बचावला

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले असून पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest four people for cutting cake by metal weapon in pune print news pbs