पुणे : शहरात बेकायदा देशी बनावटीची पिस्तुले खरेदी-विक्री करणाऱ्या नऊ सराइतांना पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि सिंहगड रस्ता पोलिसांनी ही कारवाई केली. सराइतांच्या टोळीकडून सात पिस्तुलांसह ११ काडतुसे जप्त करण्यात आली. पिस्तुलांचा वापर गंभीर गुन्ह्यांसाठी केला जाण्याची शक्यता होती. पोलिसांनी कारवाई केल्याने सराइतांचा डाव उघळला गेली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे उपस्थित होते. याप्रकरणी आकाश बळीराम बीडकर (वय २४, रा. दत्तवाडी), सुभाष बाळू मरगळे (वय २४, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक), सागर जानू ढेबे (वय २४, रा. वाडकरमळा, हडपसर), आर्यन विशाल कडाळे (१९, रा. बुधवार पेठ, सातारा) शुभम दिनेश बागडे (वय २४, सातारा) गणेश ज्योतीराम निकम (२५, रा. पिरवाडी, सातारा) तुषार दिलीप माने,,बाळू धोंडिबा ढेबे, तेजस मोहन खाटपे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी बीड, ढेबे, खाटपे यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे

गुन्हे शाखेच्या तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार आणि पथक गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस कर्मचारी गणेश चित्ते यांना सराइत आकाश बीडकर याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला एरंडवणे भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुलासह काडतूस जप्त केले. चौकशीत त्याने हे पिस्तुल त्याचा चुलत मामासोबत सुरू असलेल्या जमीनीचे वादातून बदला घेण्यासाठी खरेदी केल्याचे सांगितले.

हेही वाचा >>>पुणे: घरफोडीच्या गुन्ह्यात तीन वर्ष गुंगारा देणारा चोरटा अटकेत

मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी

पिस्तूल घेण्यासाठी त्याला सुभाष मरगळे या आरोपीने मदत केली. सागर जानू ढेबे याच्याकडून पिस्तूल घेतल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी ढेबेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त केले. ३० नोव्हेंबर रोजी ढेबे अणि साथीदार ओंकार लोकरे दुचाकीवरुन निघाले होते. त्या वेळी अथर्व तरंगेने त्यांच्यावर गोळीबार केला होतता. हल्ल्यात ओंकार याचा मृत्यू झाला होता. ढेबेच्या पायला गोळी लागली होती. मित्राचा खुनाचा बदला घेण्यासाठी त्याने मध्यप्रदेशातून ७ पिस्तुले आणल्याची कबुली दिली. आरोपी सागरने प्रत्येकी एक पिस्तूल सुभाष मरगळेला, आर्यन कडाळे, बाळु ढेबे यांना दिल्याचे सांगितले. दोन पिस्तुले तुषार मानेला दिल्याचे सांगितले. गुन्हे शाखेसह सिंहगड पोलिसांनी सराईतांना अटक करुन पिस्तूलांचा साठा जप्त केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त गणेश इंगळे, अजय परमार, वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर, वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, चेतन शिरोळकर, पुष्पेंद्र चव्हाण, शंकर कुंभार, सोनम नेवसे, विनोद चव्हाण यांनी केली.

Story img Loader