पुणे : नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या नाशिकमधील दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून २१ किलो गांजा, दोन मोबाइल संच, दुचाकी असा चार लाख २४ हजार रुपयांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजय रमेश शेलार (वय २८), दीपक अशोक मोहिते (वय २१, दोघे रा. दळेगाव, ता. येवला, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोघांच्या विरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेलार आणि मोहिते नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई गाव परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत गांजा सापडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून २१ किलो गांजा, मोबाइल संच, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest two drug peddlers with 21 kg of ganja pune print news rbk 25 zws