लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: सरकारमान्य धान्य बेकायदा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या टोळीला शिरगाव परंदवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २७ लाख ६२ हजार रुपयांचा ३५ टन तांदूळ जप्त करण्यात आला.
राजू नागनाथ केंद्र ( वय ३२, रा. गोकुळनगर, कात्रज), अमोल लक्ष्मण सोळसकर (वय ४२), सचिन वसंत धुमाळ (वय ३१, दोघे रा. कोरेगाव, सातारा) आणि संजय शिवलिंग वाघोलीकर ( वय ५४, रा. बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा… मोठी बातमी! एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
मुंबई-पुणे महामार्गाने आरोपी सरकारमान्य धान्य बेकायदा विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन ट्रक धान्यासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही ट्रकमध्ये सरकारमान्य ३५ टन तांदूळ बेकायदा वाहून नेत असताना मिळून आला. याबाबत तहसील कार्यालय मावळ येथील पुरवठा अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे.