पुणे: निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली. प्राथमिक तपासात उपहारगृहाच्या जागेचा वादातून शेख यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी प्रमोद काकडे (वय ४५, रा. वानवडी बाजार) याला अटक करण्यात आली आहे. या बाबत इशा वजीर शेख (वय ५६, रा. ब्रम्हा आंगण सोसायटी, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वजीर शेख यांनी वानवडीतील संविधान चौकात नेचर ग्रो टुरिझम हाॅटेल सुरू केले आहे. त्यांनी दहा वर्षाच्या भाडेकराराने जागा घेतली आहे. काकडे याची तेथे जागा होती. काकडेकडे त्यांनी भाडेकराबाबत विचारणा केली होती. काकडे भाडेकरार न करता शेख यांच्याकडून कायम पैसे घ्यायचा. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
shoes of accused in Saif attack case seized Mumbai crime news
पोलिसांच्या हाती आणखी पुरावे; सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीचे बूट जप्त
Pune Municipal Corporation news in marathi
प्रशासन राज आणि चुकलेला ‘अंदाज’
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत

शुक्रवारी रात्री शेख आणि काकडे चर्चा करत होते. काकडेने वाद घालण्यास सुरुवात केली. तेथे पडलेला दगड उचलून त्याने शेख यांच्यावर हल्ला केला. शेख यांच्या चेहऱ्यावर दगड मारण्यात आला. त्यांचा चेहरा दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. काकडेने केलेल्या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले. शेख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी काकडेला अटक करण्यात आली आहे, असे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले.

Story img Loader