लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: फस‌वणुकीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने सोमवार पेठेत पकडले. प्रफुल्ल जयवंत कोळी (वय ३०, रा. रेवळ, ता. अलिबाग, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कोळी याच्याविरुद्ध सप्टेंबर २०२० मध्ये कुलाबा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. कोळी याने स्वतःच्या मालकीची नसलेली मासेमारीच्या नावेची एकास विक्री केली हाेती. त्याच्याकडून तीन लाख ८० हजार रुपये घेऊन तो पसार झाला होता. कुलाबा पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

हेही वाचा… पिंपरी चिंचवडमधील पुरवठ्याच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन; अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित

मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस कर्मचारी निलेश साबळे सोमवार पेठेत गस्त घालत होते. तेव्हा फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी कोळी सोमवार पेठेतील एका हाॅटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, निलेश साबळे, अजय थोरात, दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अभिनव लडकत, अण्णा माने, महेश बामगुडे आदींनी ही कारवाई केली.