मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळील दरीपूल परिसरात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.
किरण रोहिदास शेंडकर (वय २४, रा. दत्तमंदिराजवळ, गुजरवाडी, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आदेश सुभाष मगरे (वय २३), योगेश गोकुळ सपकाळे (वय २८), विशाल विष्णू कांबळे (वय २५, तिघे रा. आंबेगाव पठार) यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> राज्यातील १८९ कैद्यांची शिक्षा माफ, प्रजासत्ताक दिनी कारागृहातून मुक्तता
याबाबत रोहिदास शेंडकर (वय ५०) यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण शेंडकर आणि आरोपी आदेश मगरे, योगेश सपकाळे, विशाल कांबळे यांच्यात वाद झाला होता. वादातून तिघांनी किरणला बेदम मारहाण केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला होता. पसार झालेल्या आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे तपास करत आहेत.