पुणे: रोगनिदान प्रयोगशाळेचा व्यवसाय कमी झाल्याने एका रोगनिदान प्रयोगशाळेच्या मालकाने गुंडांना पाठवून तोडफोड केल्याची घटना बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर परिसरात घडली. रक्त तपासणीसाठी आलेल्या तरुणावर आरोपींनी शस्त्राने वार केले. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली.
आशिष सुरेश दुधणीकर (वय २४), धीरज लहू धेले (वय १९), अक्षय प्रताप निकम (वय २४, तिघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मारुती दत्तू चव्हाण (वय २१, रा. कोंढवा) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर परिसरात मेडिको लॅब आहे. लॅबचा मालक अक्षय निकम आहे. या भागात पूना डायग्नोस्टिक लॅब आहे. पूना डायग्नोस्टिक लॅबमुळे व्यवसाय कमी झाल्याने निकम हा चिडला होता. त्याने आरोपी दुधणीकर, धेले यांना पूना डायग्नोस्टिक लॅबमध्ये पाठविले. मुलाची रक्त तपासणी करायची आहे, अशी बतावणी करुन आरोपी लॅबमध्ये शिरले. त्या वेळी तेथे रक्ततपासणी करण्यासाठी आलेल्या एकावर शस्त्राने वार केले.
हेही वाचा… लोहमार्ग दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे फाटक बंद; मुंढव्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने
पूना डायग्नोस्टिक लॅबचे मालक योगेश घोडके यांना आरोपी निकम याने धमकी दिली. ‘नीट व्यवसाय करायचा. तुमच्यामुळे माझ्या लॅबचा व्यवसाय कमी झाला आहे’ अशी धमकी निकमने घोडके यांना दिली. आरोपी दुधनीकर, धेले, निकम यांनी लॅबची तोडफोड केली. सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.