शिरुर : शिरुर शहरात कोयत्याने दहशत निर्माण करणा -या तीन जणांना पोलीसांनी जेरबंद केले आहे . १) शाहिद गफुर शेख २) सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख ३) प्रदिप भाउसाहेब गायकवाड सर्व, रा. प्रितम प्रकाश नगर शिरूर ता शिरूर जि पुणे अशी जेरबंद झालेल्यांची नावे असून न्यायालयाने आरोपीना २० फेबृवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सुरेश शंकरराव भांगे वय ६१ वर्ष, धंदा हॉटेल व्यवसाय रा. गुरूकुल सोसायटी, प्रितम प्रकाश नगर, शिरूर, ता .शिरूर जि. पुणे यांनी फिर्यादी दिली आहे .दिनांक दि. १८ फेबृवारीस सायंकाळी चारच्या सुमारास शिरूर शहरातील पाबळ फाटा व प्रितमप्रकाश नगर हॉटेल शिवम येथे शाहिद गफुर शेख २) प्रदिप गायकवाड यांनी पाबळ फाटा येथे सुरेश भांगे यांचे कामगार हकीक खान याची मोटारसायकल अडवुन जबरदस्तीने गाडीवर बसुन त्यास दमदाटी करत प्रितमप्रकाशनगर येथे सोडवण्यासाठी दबाव टाकला व हॉटेल शिवम समोर येउन तेथे हॉटेलचे मॅनेजर पवन बिच्चेवार यास शिवीगाळ दमदाटी करून पुन्हा सायंकाळी पाचच्या सुमारास १) शाहिद गफुर शेख २) सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख ३) प्रदिप गायकवाड यांनी शिवम हॉटेलमध्ये लोखंडी कोयता घेउन येउन दहशत करीत हॉटेल मॅनेजर पवन बिच्चेवार याचे मुंडके तोडण्याची भाषा करून शिवीगाळ दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली . या बाबत पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह फौजदारी सुधारणा कायदा २०१३ चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सदर गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवुन आरोपीना तात्काळ ताब्यात घेणेबाबत तपास पथकाला आदेश दिले होते. सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार तपास करीत असताना पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, सचिन भोई, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड यांना सदर गुन्हयातील पाहीजे असलेले तीनही आरोपी रेणुका माता मंदीर, शिरूर, येथे असल्याबाबत बातमी मिळाल्याने त्यांनी तेथे सापळा लावुन १) शाहिद गफुर शेख २) सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख ३) प्रदिप भाउसाहेब गायकवाड सर्व रा. प्रितम प्रकाश नगर , शिरूर ता शिरूर, जि. पुणे यांना ताब्यात घेतले आहे. आरोपीना न्यायालयाने दिनांक २० फेबृवारी २०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली असुन आरोपीनी गुन्हा करते वेळी वापरलेला कोयता त्यांचेकडुन जप्त करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप करीत आहेत .