वैभवशाली परंपरा असलेली विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर आटोपण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत खंड पडणे किंवा रेंगाळल्यास पोलिसांकडून मिरवणूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न

वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणूक करोना संसर्गामुळे काढण्यात आली नव्हती. दोन वर्षांच्या खंडानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी (९ सप्टेंबर) विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून, प्रथेप्रमाणे मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मुख्य विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे. विसर्जन मिरवणूक सोहळ्यातील बंदोबस्ताची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त गुप्ता बोलत होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा या वेळी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणूक शांततेत; तसेच सुरळीत पार पाडण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. गुरुवारी (८ सप्टेंबर) शहर तसेच उपनगरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० उपायुक्त, २१ सहायक पोलीस आयुक्त, ५५ पोलीस निरीक्षक ,३७९ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच चार हजार ५७९ पोलीस कर्मचारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक सोहळा लवकरात लवकर आटोपण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत खंड पडल्यास किंवा रेंगाळल्यास त्वरीत मिरवणूक मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शनिवारी (१० सप्टेंबर) सकाळपर्यंत विसर्जन मिरवणूक आटोपण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे, असे गुप्ता यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> जेजुरी : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार- फडणवीस

आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास कारवाई
विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. उच्चक्षमतेचे ध्वनिवर्धक; तसेच आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिला.

संशयास्पद वस्तू आढळल्यास तक्रार करा
विसर्जन मिरवणुकीचे पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. मिरवणुकीत संशयास्पद व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्षात (दूरध्वनी-११२) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांसाठी मदत केंद्र विसर्जन मार्गावर राहणार आहे.

मेट्रो पुलामुळे देखाव्यांची उंची मोजण्याचे काम
खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलामुळे मिरवणुकीतील देखाव्यांची उंची १८ फुटांपेक्षा कमी असावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गुरुवारी (८ सप्टेंबर) मध्यरात्रीपासून विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे रथ विसर्जन मार्गावर दाखल होतात. देखाव्यांची उंची पोलिसांकडून मोजण्यात येणार आहे. त्यामुळे खंडुजीबाबा चौकातील मेट्रो पुलाच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी नमूद केले.

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, मिरवणुकीत कायदा-सुव्यवस्थेबाबतची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दागिने, मोबाइल हिसकावणे, छेड काढणे असे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांची पथके गस्त घालणार आहेत.– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त.