पिंपरी : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामध्ये (सीबीआय) सहा वर्षे प्रतिनियुक्तीवर काम केलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) हवालदाराने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत उद्योजकाची १२ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बावधन येथे उघडकीस आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विनोद आण्णाप्पा थोरवत (वय ३९, रा. गिजवणे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर, त्याचा साथीदार मित्र मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर असून सध्या सीबीआयच्या मुंबई कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरवत याला २९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याबाबत सुहास अशोकराव वानखडे (वय ४०, रा. बावधन) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा – ‘शिरूर’ची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे; माऊली कटके यांची उमेदवारी जाहीर
सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवत हा हडपसर येथे राज्य राखीव पोलीस दलात ग्रुप एकमध्ये कार्यरत आहे. सन २०१६ ते २०२२ या कालावधीत तो सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर होता. त्यानंतर तो पुन्हा एसआरपीएफमध्ये दाखल झाला. तर, वानखडे यांची बावधन येथे सेफ टेक्नो सर्व्हिसेस कंपनी आहे. या कंपनीचे एक प्रकरण पूर्वी सीबीआयकडे चौकशीसाठी होते. ते निकाली निघाले होते. आरोपी थोरवत याचा मुंबई सीबीआय कार्यालयात असलेल्या मित्राला वानखडे यांच्या प्रकरणाची माहिती होती. त्याआधारे दोघांनी संगनमत करून वानखडे यांच्याकडून पैसे उकळण्याचा डाव आखला. त्यानुसार, थोरवत हा त्याच्याकडील सीबीआयमध्ये असतानाचे रंगीत छायांकित ओळखपत्र घेऊन वानखडे यांच्या कंपनीत गेला. मी सीबीआयचा अधिकारी असून तुमची नस्ती (फाईल) माझ्याकडे तपासणीसाठी आली असल्याची खोटी माहिती सांगितली. ही नस्ती बंद करण्यासाठी १२ लाख रुपये देण्याची मागणी केली. परंतु, वानखडे यांना त्याच्या बोलण्यावर संशय आला. त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बावधन पोलीस तपास करत आहेत.