पुणे : स्वारगेट भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस हवालदार प्रीती मोरे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लर चालक सुनीता नामदेव मांजरे (वय ३३) हिला अटक करण्यात आली. याप्रकरणी मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; नायलॉन मांजा विक्रेत्यंना पकडले

Man robbed near Pune railway station
पुणे स्टेशन परिसरात नशेबाज चोरट्यांची दहशत; पैसे देण्यास नकार दिल्याने एकावर ब्लेडने वार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
savitribai phule pune university warns affiliated colleges for not providing naac information
‘नॅक’ची माहिती न दिल्यास प्रवेशांवर निर्बंध; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
supreme-court-
“प्रत्येक वैयक्तिक मालमत्ता समाजासाठी उपयुक्त संपत्ती असू शकत नाही”, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!
There was no attack on BJP rebel candidate Vishal Parab car
भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला नाही,तो वाट चुकलेला परप्रांतीय कामगार
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट भागातील एका इमारतीत आरोपी सुनीता मांजरे मसाज पार्लर चालवित होती. मसाज पार्लरच्या नावाखाली तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली. मसाज पार्लरमधील तरुणींना ताब्यात घेण्यात आले. मसाज पार्लर चालक महिला मांजरे हिच्यासह साथीदाराविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> सराइताला जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रे; आरोपीकडून बनावट आधारकार्ड, शिधापत्रिका जप्त

मांजरेला अटक करण्यात आली आहे. तिने तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुभाष राठोड तपास करत आहेत. मसाज पार्लरच्या नावाखाली शहरात वेश्याव्यवसाय करण्यात येत असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. पोलीस आयुक्तांनी मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाईचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी पोलिसांनी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी ३३ गुन्हे दाखल केले होते.

Story img Loader