पुणे : सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या मावळ तालुक्यातील गड-किल्ल्यांना पर्यटक, दुर्गप्रेमी नियमित भेट देतात. ऐतिहासिक गड-किल्ल्यांची नियमित स्वच्छता राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ बुधवारी कार्ला येथील श्री एकवीरा देवी गडावरून करण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याचे वैभव असलेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांची तसेच बौद्धकालीन लेण्यांची स्वच्छता राखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ ही मोहीम हाती घेतली आहे. आठवड्यातून एक दिवस गड-किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती लोणावळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली.

Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात
Chief Minister Devendra Fadnavis launches drug-free Navi Mumbai campaign
नवी मुंबई पोलिसांचा नशामुक्तीचा नारा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ
mumbai municipalitys bridge connecting Marve and Manori beaches has received approval
मार्वे मनोरी जोडणाऱ्या पुलाला पर्यावरणाची मंजुरी
blossoms of Cosmos flowers in Autumn season
निसर्गलिपी – शरद ऋतूतील बहर…

हेही वाचा >>> पिंपरी : ‘वायसीएम’मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आठ जणांवर दंडात्मक कारवाई, रुग्णसेवा सोडून योग प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या संकल्पनेतून (टूरिझम पोलिसिंग) ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ बुधवारी (२६ एप्रिल) श्री एकवीरा गड येथून करण्यात आला. तेथील बौद्धकालीन लेण्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. लोणावळा परिसरातील गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळांच्या स्वच्छता मोहिमेत पोलीस, विद्यार्थी, सामाजिक, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते, वकील, पत्रकार सहभागी झाले आहेत. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात आठवड्यातून एक दिवस गड-किल्ले, पर्यटनस्थळांच्या परिसरात आठवड्यातून एक दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, असे कार्तिक यांनी नमूद केले.

लोहगड, विसापूर, तिकाेना, तुंग, राजमाची किल्ल्यांसह कार्ला, भाजे लेणी, लोणावळा परिसरात पर्यटनस्थळे टायगर पाॅईंट, लायन्स पाॅईंट, राजमाची पाॅईंट, भुशी धरण तसेच लोणावळा शहर परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. ऐतिहासिक स्थळांचा वारसा जपणे तसेच संवधर्नासाठी ही माेहीम सुरू करण्यात आली असल्याचे कार्तिक यांनी सांगितले. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Story img Loader