लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: लूटमार प्रकरणात पोलिसांना पाच वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पर्वती दर्शन भागात पकडले. प्रकाश शरणप्पा बिराजदार (वय ३०, सध्या रा. पर्वतीदर्शन, मूळ रा. बिंबळगी, जि. विजापूर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. २०१८ मध्ये बिराजदार आणि साथीदाराने वाहनचालकांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली होती.

आरोपी बिराजदार मूळचा कर्नाटकातील असून तो गुन्हा करुन कर्नाटकात पसार झाला होता. गेले पाच वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. बिराजदारचे कुटुंबीय पर्वती दर्शन भागात राहायला आहेत. तो त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि अमित सुर्वे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे आणि पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader