लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शाळकरी मैत्रिणीला भेटण्यासाठी बुरखा परिधान करणे तरुणाच्या अंगलट आले. विश्रांतवाडी पोलिसांनी एका तरुणाला पकडले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. तरुण एका केटरिंग व्यावसायिकाकडे कामाला आहे. त्याची एका शाळकरी मुलीशी मैत्री होती. ही माहिती मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्याला चोप देण्यात आला होता. कुटुंबीयांनी मुलीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मुलीला भेटण्यासाठी त्याने शक्कल लढविली. त्याची आई जुने कपडे गोळा करण्याचा व्यवसाय करते. त्याला घरात एक बुरखा सापडला. बुरधा परिधान करुन तो मैत्रिणीला भेटण्यासाठी शाळेच्या परिसरात गेला.

आणखी वाचा-राज्याला अवकाळी पावसाने झोडपले; जाणून घ्या कोणकोणत्या भागात झाले पिकांचे नुकसान

त्यानंतर एकाने बुरधा परिधान केलेल्या तरुणाला पाहिले. शाळेच्या आवारात बुरखा घालून एकजण मुलींचे अपहरण करण्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. तपास करुन तरुणाला पोलिसांनी पकडले. चौकशीत मैत्रिणीला भेटण्यासाठी बुरखा परिधान केल्याचे विजयने पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहू सातपुते, दीपक चव्हाण, शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे आदींनी ही कारवाई केली.