पुणे : वाहतूक नियम धुडकाविणाऱ्या बेशिस्तांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या ३५ हजारांंहून जास्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे प्रमाण मोठे असून, अशा प्रकारच्या बेदरकारपणामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे शहर, परिसरात वाहतूक नियमभंगाचे प्रमाण मोठे आहे. बेशिस्त वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवित असल्याने गंभीर अपघात घडतात. वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. नोव्हेंबरअखेरीपर्यंत ३० हजार ९२७ चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ‘ट्रिपल सीट’ वाहन चालविणाऱ्या तीन हजार ३४१, तर ६३४ मद्यपि चालकांविरुद्ध कारवाई झाली असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

हेही वाचा >>> राज्यघटनेचा संस्कृत अनुवाद राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित; प्रकल्पामध्ये दोघा पुणेकरांचा सहभाग

कारवाई करूनही वाहनचालक सर्रास वाहतूक नियमभंग करत असल्याचे दिसून आले. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाइलवर संभाषण, एका दुचाकीवरून तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), मद्य पिऊन वाहन चालविणे, मोटार चालविताना आसनपट्टा (सीट बेल्ट) न लावणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास केले जातात. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा, तसेच संबंधिताचे वाहन सहा महिन्यांसाठी जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

हेही वाचा >>> सियाचिन, कारगिल युद्धभूमीवर आता पर्यटनही शक्य

शहरात गंभीर स्वरूपाच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलीस दिवसभरात दोन सत्रांत काम करतात. वाहतूक शाखेतील ८५० पोलीस कर्मचारी दोन सत्रांत विविध चौकांत वाहतूक नियमन करतात. वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे गंभीर अपघात घडतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडते. शहरात दररोज दोन ते तीन गंभीर अपघात घडतात, असे निरीक्षण वाहतूक पोलिसांनी नोंदविले आहे.

शहरात अपघाताच्या वाढलेल्या प्रमाणामुळे वाहतूक नियमभंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यापुढील काळात ती सुरूच राहणार आहे. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्या अडीच हजार जणांंविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५०० जणांचा वाहतूक परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे. संबंधित चालकांंचा परवाना किमान सहा महिन्यांंपर्यंत निलंबित होणार असल्याने त्यांना वाहन चालविण्यास बंदी असणार आहे. – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

नोव्हेंबर महिन्यातील वाहतूक पोलिसांची कारवाई

एका दुचाकीवरून तिघांचा प्रवास ३३४१

विरुद्ध दिशेने वाहन चालविणे ३०,९२७

मद्य पिऊन वाहन चालविणे ६३४

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police charge 35000 drivers for violation of traffic rule pune print news rbk 25 zws