पुणे – अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांचा आनंद लुटण्यासाठी टिळक चौक नागरिकांनी फुलून केला असतानाही रुग्णवाहिकांना मार्ग काढून देण्याची तत्परता नागरिकांकडून दाखवण्यात आली. त्यांना पोलिसांचे सहकार्यही मिळाले. पावणेसहाच्या दरम्यान, टिळक चौकात मानाचा तिसरा गुरुजी तालीम सार्वजनिक गणपती दाखल होण्यापूर्वी रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन टिळक चौकात दाखल झाली. त्याबरोबर गर्दीने स्वयंस्फूर्तीने रुग्णवाहिकेला मोकळी वाट करुन दिली. यानिमित्ताने उत्सवी आनंदातही पुणेकरांच्या सामाजिक जाणिवेचे दर्शन घडले.
पुणे : उत्सवी उत्साहातही रुग्णवाहिकांना मार्ग देण्यासाठी पोलिस आणि नागरिक तत्पर
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांचा आनंद लुटण्यासाठी टिळक चौक नागरिकांनी फुलून केला असतानाही रुग्णवाहिकांना मार्ग काढून देण्याची तत्परता नागरिकांकडून दाखवण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
Updated: 
First published on: 09-09-2022 at 18:21 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police citizens ready give way ambulances festive spirit pune print news ysh