पुणे : ‘बेकायदा धंदे, गुंडगिरी, तसेच जमिनीवरील ताब्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गुंडांनी सामान्यांना त्रास दिल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कायद्याचे पालन करा अन्यथा शहर सोडून जा’, असा कडक इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिला.

चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला दोन कोटी रुपयांचा ऐवज सोमवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, मनोज पाटील, शैलेश बलकवडे, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, गु्न्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यावेळी उपस्थित होते.

Pune Municipal Corporation will spend 300 crores to fulfill Prime Minister Narendra Modi's dream Pune print news
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महापालिका करणार ३०० कोटी खर्च ?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Marathi people from abroad , Marathi Sahitya Samelan,
साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”

हेही वाचा >>>“मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांची मागणी

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘ पुणे पोलिसांच्या परिमंडळ पाचमधील विविध पोलीस ठाण्यांतील तपास पथकांनी घरफोडी, चोरी अशा गुन्ह्यातील मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त केला. पोलिसांनी दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिक, तसेच तक्रारदारांचा पोलिसांवरील विश्वास वाढतो. सामान्य नागरिक पोलिसांचे कान आणि डोळे आहेत. सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडांना यापूर्वी समज दिली आहे. शहरात गुंडगिरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. ज्यांना कायदा पाळायचे नसेल, त्यांनी शहर सोडू जावे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या गुंडांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा >>>साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक

सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये विश्वासाचे नाते घट्ट होईल, असे त्यांनी नमूद केले.

न्यायालयीन प्रक्रियेसाठी पोलिसांचा पाठपुरावा आवश्यक

चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेला ऐवज तक्रारदारांना परत देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेची पूर्तता करावी लागते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिसांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. दागिने मौल्यवान आहेत. मात्र, महिलांच्या भावना दागिन्यात गुंतलेल्या असतात. त्यामुळे सामान्य तक्रारदारांना न्याय देण्यासाठी पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आदेश त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले.

नववर्षाची अनोखी भेट

या कार्यक्रमात पोलीस आयुक्तांच्या हस्ते ८८ तक्रारदारांना दोन कोटी रुपयांचा ऐवज परत करण्यात आला. चोरट्यांकडून जप्त केलेला ऐवज पुन्हा मिळाल्याने तक्रारदारांच्या डोळ्यात अश्रृ तरळले. दागिने परत मिळाल्याने नववर्षाची अनोखी भेट मिळाली, अशी भावना तक्रारदारांनी व्यक्त केली.

Story img Loader