पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी मोटारीचा वेग, तसेच दुचाकीला धडक दिल्यानंतर पडलेला प्रभाव अशा तांत्रिक बाबींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात आली आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या मदतीने पोलिसांनी अपघात प्रभाव मूल्यांकन (क्रॅश इम्पॅक्ट ॲसेसमेंट) नुकतेच केले.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी अपघात झाला. अपघाताचा प्रसंग पोलिसांनी पुन्हा उभा (रिक्रिएशन) केला. दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुणासह तरुणीला मोटारीने धडक दिली. तेव्हा मोटारीचा वेग किती होता. अपघातानंतर वेगाचा प्रभाव किती पडला? याची सविस्तर माहिती घेण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेल्या अपघातग्रस्त मोटारीची पाहणी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून करण्यात आली. अपघात प्रभाव मूल्यांकन पोलिसांकडून करण्यात आले. अपघातात मृत्यूमुखी पडलेला संगणक अभियंता तरुण-तरुणीचा शवविच्छेदन अहवालाची पाहणी पुन्हा करण्यात आली. मोटारीच्या धडकेनंतर सहप्रवासी तरुणी १५ ते २० फूट हवेत उडाली आणि ती मोटारीच्या काचेवर पडली. अपघात प्रभाव मूल्यांकनाचा अहवाल पोलिसांना मिळालेला असून, त्याचा उपयोग न्यायालयीन कामकाजात करण्यात येणार आहे.

Badlapur case, school trustees Badlapur case,
बदलापूर प्रकरण : …तर शाळेच्या विश्वस्तांना अद्याप का शोधू शकला नाहीत ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना संतप्त प्रश्न
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Petition to High Court to Create clear rules for compensation after damages due to electric shock
विजेचा धक्का लागल्याने अपघात, नुकसान भरपाईसाठी स्पष्ट नियमावली तयार करा; उच्च न्यायालयात याचिका
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
Bombay HC
उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा ‘fake news’ fact check rule मोडीत का काढला? त्रयस्थ न्यायाधीशांची गरज का भासली?
SEZ company objected to decision to return land purchased by farmers
उरण : जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यास सेझ कंपनीची हरकत,पुढील सुनावणी ९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
Submitted fake document in high court to get illegal benefit of 20 crores
२० कोटींचा बेकायदा लाभ घेण्यासाठी उच्च न्यायालयात बनावट कागदपत्र सादर, चौघांविरोधात गुन्हा दाखल

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशी विनंती पुणे पोलिसांकडून विधी विभागाकडे करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> Video : इंजिनिअर तरुणीला कारने दिली भीषण धडक; तरुणी काही फूट अंतरावर उडाली

पोलिसांकडून ‘एआय’चा वापर

पोलिसांकडून आर्टिफिशिअल इंटिलिजिन्सचा वापर करण्यात येणार आहे. अपघाताचा प्रसंग ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे. त्यासाठी बंगळुरू, हैद्राबाद येथील तंत्रज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पुणे : गुगलवरील कॉल गर्लचा मोबाईल नंबर बेतू शकतो जीवावर; कॉल गर्लमुळे तरुणाची आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

ससूनमधील शस्त्रक्रियेत डॉ. तावरेची दलाली

ससून रुग्णालयात शस्त्रक्रियेच्या नियोजनासाठी ३० ते ४५ दिवसांचा कालावधी दिला जातो. डॉ. तावरेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया लवकर केल्या जात होत्या. त्यासाठी रुग्ण, तसेच नातेवाईकांना पैसे मोजावे लागत होते. डॉ. तावरेने त्यासाठी खास दलाल नेमले होते. ससूनमधील शस्त्रक्रियेत न्यायवैद्यक शास्त्र विभागातील डॉ. तावरे दलाली घेत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगरमधील रुग्ण दलालांमार्फत ससूनमध्ये उपचारासाठी दाखल व्हायचे. दलालामार्फत डाॅ. तावरेला पैसे मिळाल्यानंतर संबंधित रुग्णांच्या शस्त्रक्रिया लवकर केल्या जायच्या.