पुणे : दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी एकाकडून नऊ हजारांची लाच घेणाऱ्या बारामती तालुका पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रदीप दत्तात्रय काळे (वय ४४) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार तरुणाविरुद्ध बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यात न्यायालयाने तरुणाला बारामती पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. हजेरीची नोंद करणे तसेच दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार प्रदीप काळे यांनी तक्रारदार तरुणाकडे नऊ हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा काळे यांनी लाच मागितल्याचे उघड झाले.

हेही वाचा – धायरी येथे अल्पवयीन मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला;सायकलचे हँडल पोटात घुसून आतडे बाहेर

हेही वाचा – चिंचवडमध्ये महावितरणचा आकडेबहाद्दरांना दणका; चौदाशे वीजचोऱ्या उघड

काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पाेलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable from baramati caught taking bribe to assist in the investigation pune print news rbk 25 ssb