चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून कुऱ्हाडीने तिचे शिर धडावेगळे करणारा आरोपी रामचंद्र सेऊ चव्हाण (वय ६०) याला १३ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कात्रजच्या सुखसागरनगर भागातील ओशियन सोसायटीसमोरील ओसवाल प्लॉट येथे राहणारा व त्याच ठिकाणी रखवालदार म्हणून काम करणाऱ्या चव्हाण याने शुक्रवारी सकाळी कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीचा खून केला होता. इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने पत्नीचे शिर धडावेगळे केले. त्यानंतर हे शिर व रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन तो भररस्त्याने चालत निघाला होता. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अडविले व अटक केली. त्यानंतर शनिवारी त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.

Story img Loader