ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीनचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. शिवसेनेने यापूर्वीच या सभेविरोधात भूमिका घेतली होती. ओवेसी यांच्या भाषणामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या, तर शिवसेना सहन करणार नाही. सभा शिवसेनेच्यावतीने बंद पाडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या सभेविरोधात भूमिका घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीसांनी या सभेला परवानगी नाकारली.
काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे नाटक कंपनी- ओवेसी
अ‍ॅक्शन कमिटी महाराष्ट्र व मुलनिवासी मुस्लिम मंचच्या वतीने ४ फेब्रुवारीला पुण्यातील गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ओवेसी सभा घेणार होते. मुस्लिम आरक्षण विषयावर ही परिषद होणार आहे. या परिषदेसह ओवेसी यांच्या भाषणासाठी पोलीसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, वानवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या सभेला परवानगी नाकारली आहे.