नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (३१ डिसेंबर) शहरात कडक बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे. शहर परिसरात दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन गोंधळ घालणे तसेच हुल्लडबाजांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा >>>पुणे: राष्ट्रीय तालवाद्य स्पर्धेत पार्थ भूमकर विजेता

nashik district collector jalaj sharma
नववर्षात जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचारी गणवेशात, जलज शर्मा यांच्यासह मनिषा खत्री यांचीही पायी भ्रमंती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
case registered Shaniwar Peth police pune young man abuse the police
नववर्षाच्या मध्यरात्री पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा, शनिवार पेठ पोलीस चौकीत तरुणाचा गोंधळ
pune police action on 85 drunkards
पुणे : नववर्षाच्या मध्यरात्री ८५ मद्यपी जाळ्यात, बेशिस्त वाहनचालकांकडून २० लाखांचा दंड वसूल
Police took action against 17800 reckless motorists
बेताल चालकांवर कारवाई, १७ हजारांहून अधिक चालकांना ८९ लाख रुपये दंड
Crowds gather at the wealthy Dagdusheth Halwai Ganapati temple for darshan Pune news
नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी; मध्यभागात कोंडी
fire broke out at Nashik, New Year Eve, houses, godown damged
नववर्षाच्या पहाटे नाशिकमध्ये आग; गोदामासह चार घरे भस्मसात, दोन जखमी
Thane Police made strict security arrangements on eve of new year celebration
नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला कडेकोट बंदोबस्त

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, एबीसी फार्म रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता परिसरात गर्दी करतात. सरत्या वर्षाला निरोप देताना सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याच्या घटना घडतात. अनुचित घटना रोखण्यासाठी शहर, उपनगर परिसरात शनिवारी २७०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. शहरातील लाॅज, हाॅटेल्सची पोलिसांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्या सराईतांची चौकशी करण्यात येत आहे. ज्या भागात गर्दी होणार आहे. तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, सात सहायक पोलीस आयुक्त, ४० पोलीस निरीक्षक, १०० सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, दोन हजार ५५० पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: कृषिमंत्र्यांनी राजकीय स्वार्थासाठी आयोजित केलेला सिल्लोड महोत्सव रद्द करा; स्वतंत्र भारत पार्टीची मागणी

अनुचित घटना घडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

शहर, उपनगरात अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी त्वरीत पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्ष (दूरध्वनी- ०२०-२६१२६२९६, ८९७५९५३१००, ११२) या क्रमांकावर संपर्क साधावा.

महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहतुकीस बंद

नववर्ष स्वागताला होेणारी गर्दी विचारात घेऊन शनिवारी (३१ डिसेंबर ) सायंकाळी सातनंतर लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, डेक्कन जिमखाना भागातील फर्ग्युसन रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी नियमांचे पालन करावे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे- रितेश कुमार, पोलीस आयुक्त

Story img Loader