पिंपरी- चिंचवड : मावळमधील शिरगाव या ठिकाणी गावठी दारू तयार करणाऱ्या अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे. वीस हजार लिटर दारू पोलिसांनी नष्ट केली आहे. शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आधी देखील अशाच प्रकारे पोलिसांनी कारवाई करत हजारो लिटर दारू नष्ट केली होती. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची अवैध धंद्यांवर करडी नजर आहे.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीपात्रालगत गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिरगाव पोलिसांनी खात्री करून त्या ठिकाणी जाऊन तब्बल वीस हजार लिटर गावठी दारू नष्ट केली. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी उपस्थित होते. या माध्यमातून अवैद्य धंदे सुरू असल्यास त्यावर आम्ही कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिला आहे.
शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहमीच अशा प्रकारे घनदाट झाडी आणि जंगल असलेल्या ठिकाणी अनेकदा गावठी दारू तयार होत असल्याचं समोर आलेलं आहे. पोलिसांनी वारंवार छापा टाकून दारू नष्ट करण्यात केल्याचं बघायला मिळत आहे. यावर कठोर कारवाई करण तितकंच गरजेचं आहे.