पिंपरी पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि ८ लाखांच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण केल्याचं समोर आलं आहे. दिलीप तुकाराम खंदारे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ८ जणांनी मिळवून विनय नावाच्या व्यक्तीचं अपहरण केलं होतं. परंतु, आपल्या मागावर पोलीस असल्याचं समजताच अपहरण केलेल्या व्यक्तीला काही तासांनी सोडून देण्यात आलं.

आरोपींनी ३०० कोटीची क्रिप्टो करन्सी आणि ८ लाखांच्या खंडणीसाठी हे अपहरण केल्याचं उघड झालं. वाकड पोलिसांनी मुख्य आरोपी दिलीप खंदारेसह एकूण ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील बहुतांश आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी पोलीस कर्मचारी दिलीप तुकाराम खंदारे, सुनील राम शिंदे, वसंत श्याम चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशीनाथ काटे, संजय उर्फ निकी राजेश बन्सल, शिरीष चंद्रकांत खोत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Six people arrested for smuggling gold worth Rs 10 crore Mumbai news
दहा कोटींच्या सोन्याच्या तस्करीत सहा जणांना अटक; तीन आरोपी विमानतळावरील कर्मचारी
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
mla mahesh landge claim bangladeshi and rohingyas working in scrap warehouses
पिंपरी- चिंचवड: अनधिकृत भंगार गोदामात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंगे; आमदार महेश लांडगे
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

पोलीस मागावर असल्याचं समजताच आरोपीची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी विनय नावाच्या व्यक्तीचे अपहरण झाले होते. तशी तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानुसार, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली २ पथकं तयार करण्यात आली. मोबाईल आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलीस मागावर असल्याचं समजताच आरोपींनी अपहरण केलेल्या विनय नावाच्या व्यक्तीला सोडून दिलं. या व्यक्तीला अलिबाग येथे डांबून ठेवण्यात आलं होतं.

३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि ८ लाखांचा खंडणीसाठी अपहरण

३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि ८ लाखांचा खंडणीसाठी त्यांचं अपहरण केल्याचं विनय यांनी पोलिसांना सांगितलं. दरम्यान, वाकड पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी सुनील राम शिंदे, वसंत श्याम चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, यांना ताब्यात घेतलं. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अन पोलीस कर्मचारी दिलीप तुकाराम खंदारे आणि प्रदीप काशीनाथ काटे यांच्या सांगण्यावरून विनयचं अपहरण केल्याचं तपासात पुढं आले. त्यानुसार, दोघांना अटक केली.

आरोपी पोलीस कर्मचारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मुख्यालय कार्यरत

धक्कादायक बाब म्हणजे दिलीप तुकाराम खंदारे हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मुख्यालय येथे कार्यरत आहे. या अगोदर तो पुणे पोलीस आयुक्तालयात सायबर क्राईमला होता. तेव्हाच, अपहरण केलेल्या विनयकडे ३०० कोटी रुपयांची क्रिप्टो करन्सी असल्याचं त्याला माहिती झालं. त्यानुसारच, ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि ८ लाखांचा हव्यासपोटी प्रदीप काशिनाथ काटे यांच्यासह मिळून आरोपी पोलीस कर्मचारी खंदारेने विनयचं अपहरण केलं.

हेही वाचा : लोकसत्ता विश्लेषण : आभासी अथवा कूटचलन – भारतात, परदेशात नियमन कसे?

पीडित विनयकडून क्रिप्टो करन्सी आणि खंडणीपोटी पैसे घ्यायचे असा प्लॅन आखण्यात आला. परंतु, पोलीस कर्मचारी दिलीप खंदारेचा प्लॅन अखेर पोलिसांनीच हाणून पाडला आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची नावे पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Story img Loader