पिंपरी : महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देत पाच लाख रुपये उकळणा-या देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा यांना अटक केली आहे. तर, पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळसह शंकर गोरडे, मुन्नास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैभवसिंग मनीषकुमार सिंग चौहान (वय १९, रा. किवळे, पुणे. मूळ रा. झारखंड) या विद्यार्थ्याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…पिंपरीत धावत्या गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी; तरुणाचा पोलीस घेत आहेत शोध!

फिर्यादी चौहान हा किवळे येथील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहतो. देहूरोड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार आणि अन्य आरोपींनी मिळून चौहानकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी १० फेब्रुवारी रोजी दुपारी किवळे येथील एका कॅफे मधून त्याचे अपहरण केले. तेथून मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तेथून देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

हेही वाचा…पुणे : माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरला

चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून कारागृहात घालण्याची धमकी देण्यात आली. हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पोलिसांसह आरोपींच्या धमकीला घाबरलेल्या चौहानने गुगल पे आणि नेट बँकिंगद्वारे आरोपींना चार लाख ९८ हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र, संबंधित पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police extorted rs 5 lakh from a student in pimpri by threatening to implicate him in a fake crime pune print news ggy 03 psg