पुणे : मोबाईलमधील अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार करण्याबरोबरच पत्नीला विवस्त्र करून, नाचायला लावून त्याची चित्रफित तयार करणाऱ्या पती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.  या प्रकरणी ३१ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १२ एप्रिल २०१५ ते फिर्याद दाखल होईपर्यंत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करा, तुषार गांधींची डेक्कन पोलिसांकडे तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपीला पाच वर्षांचा मुलगा आहे. पती नेहमी फिर्यादीला मोबाईलमधील अश्लील चित्रफित दाखवून त्याप्रमाणे अत्याचार करत असे. तसेच पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावत असे. या गोष्टींना विरोध केल्यास चित्रफित समाजमाध्यमावर टाकण्याची धमकी देत असे. फिर्यादी यांना रात्री-अपरात्री दूरध्वनी करून शिवीगाळ, तसेच मारून टाकण्याची धमकी देत असे. अखेर या छळाला कंटाळून फिर्यादी या डिसेंबर २०१५ मध्ये माहेरी गेल्या. त्यावेळीही पतीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या पतीने मेव्हणीच्या कार्यालयामध्ये पत्र पाठवून ती रेक्स रॅकेट चालवत असल्याचे सांगून बदनामी केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्ना वाघमारे या प्रकरणी अधिक तपास  करत आहेत.

Story img Loader