पुणे : रविवार पेठेतील एका सराफी पेढीतून ३२ लाख रुपयांचे दागिने चोरून कारागिर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत असित पोरिया (वय ४२ रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सराफी पेढीतील कामगार अमित पाल. मुकेश पंखीरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोरिया यांची रविवार पेठेत श्रीकृष्ण गोल्डस्मिथ पेढी आहे. सराफ बाजारातील व्यावसायिक वेगवेगळे प्रकारचे दागिने घडविण्याचे काम पोरिया यांना देतात. त्यांच्या पेढीत आरोपी पाल, पंखीरा कारागिर होते.
हेही वाचा >>> घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
पोरिया यांच्या पेढीला सराफ बाजारातील एका नामांकित सराफी पेढीकडून ३३ मंगळसूत्र घडविण्याचे काम देण्यात आले होते. त्यांना सराफी पेढीकडून सोन्याची ण्देण्यात आली होती. दररोज रात्री काम झाल्यानंतर पोरिया सोन्याचे मोजमाप करायचे. कारागिरांना सराफी पेढीत राहण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती. पाल आणि पंखीरा सराफी पेढीतील एका कप्यात ठेवलेले सोने घेऊन पसार झाले. पाल आणि पंखीरा पेढीतून पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाहणी केली. तेव्हा कप्यात ठेवलेले साेने चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोरिया यांनी चौकशी केली. तेव्हा पाल आणि पंखीरा सोने घेऊन पसार झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. यापूर्वी सराफी पेढीतील कारागिरांनी सोने चोरल्याच्या घटना घडल्या आहेत.