पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नाकाबंदी दरम्यान शिरगाव पोलिसांनी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर तब्बल ५० लाखांची रोकड आढळली आहे. याबाबत शिरगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. नेमकी ही रक्कम कुठे आणि कशासाठी घेऊन जात होते. याबाबतची चौकशी शिरगाव पोलीस करत आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही कसब्याच्या वाट्याला ‘भोपळा’च?

अवघ्या देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका लागल्या आहेत. आचारसंहिता लागली आहे यामुळे मावळ लोकसभेसह इतर मतदारसंघात नाकाबंदी करण्यात येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुणे- मुंबई  द्रुतगती मार्गावर नाका बंदी दरम्यान शिरगाव पोलिसांनी चारचाकी वाहनात तब्बल ५० लाख रुपयांची रोकड मिळून आली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही चार चाकी जात असताना पोलिसांनी अडवली. यात ५० लाख रुपये आढळले आहेत. एवढी मोठी रक्कम कुठे आणि कशासाठी घेऊन जात होते. याबाबतची चौकशी शिरगाव पोलीस करत आहेत. सध्या लोकसभा निवडणुका लागल्याने मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने पिंपरी- चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police found 50 lakh rupees during nakabandi in maval lok sabha constituency kjp 91 zws