पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी गुंड सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी दीड महिन्यापुर्वीच मध्य प्रदेशातून नऊ पिस्तूले आणल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. गायकवाडचे चार साथीदार पुण्याहून मध्य प्रदेशात पिस्तूल खरेदीसाठी मोटारीने गेले होते. साठ ते सत्तर हजार रुपयांमध्ये त्यांनी नऊ पिस्तुले खरेदी केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

आंदेकर यांचा खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरविणारा सराइत अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (वय २४, रा. लक्ष्मीगार्डन सोसायटी, शिवणे, एनडीए रस्ता) याला गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. खून प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा…मेट्रोच्या उदघाटन सोहळ्याचा खर्च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मानधनामधून घेतला पाहिजे : आमदार रवींद्र धंगेकर

दरम्यान, चार दिवसापुर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पिस्तूले पुरविल्याप्रकरणी, अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (वय 24, रा. लक्ष्मीगार्डन सोसायटी, देशमुखवाडी, शिवणे) याला अटक केली आहे. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत 21 आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदेकर यांचा १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम चौक परिसरात पिस्तूलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. आंदेकर यांचा खून वर्चस्व आणि कौटुंबिक वादातून झाल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणात आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, मेहुणे जयंत, प्रकाश, गणेश, तसेच गुंड सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते मुख्य सूत्रधार आहेत. गेल्या वर्षी गायकवाडचा मित्र निखिल आखाडेचा आंदेकर टोळीने खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता. आंदेकर यांचा बहीण संजीवनीशी वाद झाला होता. वर्चस्व आणि कौटुंबिक वादातून आरोपींनी आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हे ही वाचा…कमी वयातच हृदयविकाराचा वाढतोय धोका! तो कसा ओळखावा जाणून घ्या…

गायकवाड आणि कोमकर कुटुंबीयांनी वनराज आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचला. खून करण्यापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशातून नऊ पिस्तूल खरेदी केली होती. पिस्तूल खरेदीची जबाबदारी गायकवाडने साथीदार समीर काळे, अभिषेक खोंड, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांना सोपविली होती. चौघे जण मोटारीतून धुळेमार्गे मध्य प्रदेशात गेले. पिस्तूल खरेदी केल्यानंतर गायकवाड, कोमकर आंदेकर यांचा खून करण्याची संधी शोधत होते. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.