पुणे: शाळा सुरू करण्याच्या आमिषाने एक कोटी १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्राचार्यांसह तिघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शेफाली तिवारी, तन्मय शर्मा, रोहित भार्गव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पूर्णिमा मिलिंद कोठारी (वय ६३, रा. उत्तम टाॅवर, नगर रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सी. पी. गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शेफाली तिवारी आणि पूर्णिमा तिवारी यांचा परिचय आहे. आयुष्यमती ट्रस्टच्या संचालक असल्याची बतावणी तिवारी यांनी कोठारी यांच्याकडे केली होती. २०१९ मध्ये तिवारी यांनी त्यांना आयुष्यमती ट्र्स्टकडून कॅनरी इंटरनॅनशल हायस्कूल सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. येरवड्यातील शास्त्रीनगर परिसरात कॅनरी इंटरनॅशनल स्कूल सुरू करण्यात आली.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत
Important tips to help prevent car theft
‘या’ छोट्या टिप्स फॉलो केल्यास चोर तुमची कार कधीही चोरणार नाही
Home Schooling Education System
होम स्कुलिंग शिक्षण व्यवस्थेचे भविष्य ठरू शकेल का?

हेही वाचा… पुणेकरांची पसंती परवडणाऱ्या घरांना! नोव्हेंबरमध्ये एकूण विक्रीत ५५ टक्के वाटा

शाळेत भागीदार म्हणून कोठारी यांना रक्कम गुंतविण्यास सांगण्यात आले. एक ते दाेन वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष काेठारी यांना दाखविले. त्यानंतर तिवारी यांनी कोठारी यांच्याकडून एक कोटी १७ लाख ६७ हजार ५७९ रुपये घेतले. कोठारी आणि त्यांचा मुलगा शाळेत ७० टक्के भागीदार होते. तिवारी यांनी त्यांना कोणतेही अधिकार दिले नाही. शाळेच्या बँक खात्यावर शैक्षणिक शुल्कापाेटी जमा होणारा निधी तिवारी यांनी वापरला. दरम्यान, शाळा बंद पडली. शाळेला परवानगी नसल्याने शाळा बंद पडली, असे तिवारी यांनी विद्यार्थी आणि पालकांना सांगितले. शाळा बंद पडण्यामागे कोठारी कारणीभूत असल्याचे सांगून त्यांची बदनामी केली.

फसवणूक केल्याप्रकरणी कोठारी यांनी न्यायालायत खासगी फौजदारी दावा दाखल केला. न्यायालयाने तिवारी यांच्यासह तिघांविरुद्ध कलम १५६ (३) विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक नांगरे तपास करत आहेत.

Story img Loader