पुणे शहर पोलिस दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलीस हवालदार प्रकाश यादव (वय ५८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकाश यादव हे पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात असलेल्या व्यायाम शाळेत प्रशिक्षक होते. यादव बुधवारी (३१ मे) पोलीस दलातून निवृत्त झाले.

हेही वाचा >>> पुणे: शरीरसौष्ठवासाठी बेकायदा इंजेक्शन विक्री; ओैषध विक्रेत्याला अटक

निवृत्ती झाल्यानंतर त्यांचा गुरुवारी (१ जून) राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यादव यांनी शहर पोलीस दलातील अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शरीरसौष्ठवाचे प्रशिक्षण दिले होते. मनमिळावू स्वभावाचे यादव यांच्या अकस्मात मृत्यूनंतर पोलीस दलातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

Story img Loader