पुणे: शरद माेहोळचा खुनाचा कट मुख्य सूत्रधार साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने रचला होता. गेल्या काही महिन्यांपासून तो मोहोळचा खून करण्याची संधी शोधत होता. मोहोळचा खून करण्यासाठी रचलेल्या कटात सामील होण्यास नकार दिल्याने पोळेकरने भूगाव परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर एका डाॅक्टरने उपचार केले. मात्र, पोलिसांना याबाबतची माहिती दिली नाही. तेव्हा पोळेकरने केलेल्या गोळीबाराचा प्रकार उघडकीस आला असता तर माेहोळ वाचला असता, अशी माहिती तपासात उघडकीस झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तरुणावर गोळ्या झाडून त्याचा खून केल्याप्रकरणी पोळेकर, त्याचा मामा नामदेव कानगुडे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे. संबंधित गुन्हा ग्रामीण पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली. गेल्या शुक्रवारी (५ जानेवारी) कोथरुडमधील सुतारदरा परिसरात मोहोळवर भरदिवसा पिस्तुलातून गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. खून प्रकरणात पोळेकरसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खून प्रकरणात दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा… ‘स्वच्छ’च्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा… सव्वा लाखाची चांदीची भांडी मालकाच्या स्वाधीन

तपासात पोळेकरने मुळशी तालुक्यातील भूगाव परिसरात अजय नावाच्या एका तरुणाच्या पायावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या होत्या. अजयने पोळेकरच्या खुनाच्या कटात सामील होण्यास नकार दिला होता. गंभीर जखमी झालेल्या अजयवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. याप्रकरणी डाॅक्टरांनी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर पोळेकरने संधी साधून मोहोळचा खून केला.