पुणे : अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या दोन चित्रफितींची तपासणी पोलिसांनी केली आहे. सोलापूरकरांच्या चित्रफितीत गुन्ह्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
सोलापूरकर यांची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर त्यांच्या कोथरूड परिसरात असलेल्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आली अहे. अनुचित घटना टाळण्यासाठी तेथे बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबाबत सोलापूरकर यांनी पोलिसांना सविस्तर खुलासा पाठविला आहे. त्याचे अवलोकन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला होता. त्यांच्या निवासस्थान परिसरात आंदोलन करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी विविध संघटनांनी केली.