एक्स्प्रेस वृत्त
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : पुणे पोलिसांच्या येरवडा येथील तीन एकर जमिनीचा २०१०मध्ये विभागीय आयुक्तांनी लिलाव केला होता. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ही जमीन हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता मात्र आपण त्याला नकार दिला असा गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता केला. त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या आत्मचरित्रात याबाबत दावा करण्यात आला आहे.
विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र बोरवणकर यांचा आरोप फेटाळला आहे. ‘कोणत्याही लिलाव प्रक्रियेत माझा सहभाग नव्हता. अशा प्रकारच्या लिलावांना मी विरोधच केला आहे. पालकमंत्र्यांना सरकारी जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकारच नाहीत. असे विषय महसूल विभागाच्या अखत्यारीत येतात. त्यानंतर ते मंत्रिमंडळासमोर ठेवले जातात. मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते,’’ असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीचे समर्थन करीत नाही – आमदार रोहित पवार
बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या आगामी पुस्तकात त्यांचे पोलीस दलातील अनुभव कथन केले आहेत. मुंबईतील गुन्हेगारी टोळय़ांमधील संघर्ष, बॉम्बस्फोट, जळगाव वासनाकांडासह अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास बोरवणकर यांनी केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात बोरवणकर यांची पुण्याच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातील एका प्रकरणात, पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी येरवडय़ातील पोलिसांच्या मोक्याच्या जागेच्या हस्तांतरणाचे आदेश दिल्याच्या घटनेची माहिती दिली आहे. बोरवणकर यांनी पुस्तकातील या प्रकरणात अजित पवार यांचे थेट नाव न घेता ‘तत्कालीन पालकमंत्री’ असा उल्लेख केला आहे.
हेही वाचा >>> अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात रोहित पवारांच्या दौऱ्याचा धडाका! चुलते-पुतणे असे राजकारण सुरू झालं आहे का?
‘‘येरवडय़ात पुणे पोलिसांची मोक्याच्या ठिकाणी तीन एकर जागा आहे. २०१० मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्तांनी मला दूरध्वनी केला आणि ‘दादांना तुम्हाला भेटायचे आहे’, असा निरोप दिला. त्यानंतर मी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी येरवडय़ातील तीन एकर जमिनीबाबत चर्चा झाली. ही जागा पुणे पोलिसांची आहे, भविष्यातील पुण्याचा वाढता विस्तार घेऊन ही जागा पोलिसांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या जागेत पोलिसांचे कार्यालय बांधण्यात येणार आहे. तेथे पोलीस वसाहत बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे,’’ असे मी सांगितले, असे बोरवणकर यांनी म्हटले आहे. या जागेच्या लिलावातून शासनाला चांगला महसूल मिळणार असल्याचे त्या वेळी पालकमंत्र्यांनी सांगितले होते, अशी माहितीही बोरवणकर यांनी या पुस्तकात दिली आहे. रेडी रेकनरनुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाते. त्यामुळे या प्रकरणात माझा काहीही सहभाग नाही. अशा प्रकरणात मी सरकारची बाजू कशी घेतो, याची माहिती तुम्हाला प्रशासनाकडून मिळेल. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याची चिंता करत नाही. – अजित पवार, उपमुख्यमंत्री