या टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

पिंपरी- चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं. शहरातील भोसरी एमआयडीसी, चाकण एमआयडीसीत मोठ्या प्रमाणावर कंपन्या आहेत. या परिसरात रात्रीच्या वेळी चोऱ्या करणाऱ्या टोळीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून २४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे या टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : कट मारल्याने टोळक्याची वकिलाला मारहाण

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
australia Ban on social media use
सोळावं वरीस बंदीचं?…ऑस्ट्रेलियात १६ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना सोशल मीडिया वापरास बंदी! कारणे कोणती?

या घटनेप्रकरणी अब्दुलकलाम रहिमान शहा, योगेश तानाजी चांदणे, रविशंकर महावीर चौरसिया, रिजवान खान आणि शकील मंसूरी अशी अटक आरोपींची नावे असून टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा देखील सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून भोसरी एमआयडीसीसह चाकण एमआयडीसीमध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं. याच अनुषंगाने चिखली पोलिसांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केलं. या पथकाने दिघी, म्हाळुंगे आणि चिखली परिसरात कंपनीमध्ये झालेल्या चोरीचा सीसीटीव्ही अत्यंत बारकाईने पाहिल आणि एकाच टोळीने ही चोरी केल्याच पुढे आले. यातील आरोपी हे दिवसा एमआयडीसी परिसरात बंद असलेल्या कंपनीची रेकी करून रात्री  चोरी करायचे. विशेषतः हे आरोपी कंपनीतील महागडा तांब असलेलं मटेरियल चोरायचे. कंपनीच्या बाहेर आणून हे मटेरियल ठेवल्यानंतर ते टेम्पोमध्ये घेऊन जायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी विकायचे. यामधून त्यांना लाखो रुपये मिळत असल्याचं पोलीस तपासात समोर. याच दरम्यान तांत्रिक विश्लेषण करून पोलीस अब्दुल कलाम रहिमान शहा याच्यापर्यंत पोहोचली आणि त्यानंतर त्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला, या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. आरोपींकडून २४ लाख ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यासह दिघी, चाकण, कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, परिमंडळ तीन चे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक, पोलीस कर्मचारी बाबा गर्जे, सुनील शिंदे, चेतन सावंत, विश्वास नानेकर, भास्कर तारळकर, संदीप मासाळ, दीपक मोहिते, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संतोष सपकाळ, संतोष भोर यांच्या टीम ने केली आहे.