येरवडा कारागृहात प्रकृती बिघडल्याने चकमक फेम अधिकारी अशी ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणी शर्मा यांना गेल्यावर्षी अटक करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरक्षिततेच्या कारणांमुळे शर्मा यांना मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे. कारागृहात पोटात दुखू लागल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर पुन्हा कारागृहात नेल्यावर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करून विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटके सापडल्याचे प्रकरण दोन वर्षांपूर्वी उघडकीस आले. त्यानंतर व्यावसायिक मनसुख हिरेन यांचीही हत्या झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेतील पोलीस अधिकार सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. नालासोपारा मतदारसंघातून शर्मा यांनी गेल्या वेळी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police officer pradeep sharma admitted to sassoon hospital in pune pune print news msr