पुणे : नवले पूल परिसरातील वंडरसिटी परिसरात रविवारी रात्री पोलिसांकडून चोरट्यांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. चोरट्यांनी पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रसंगावधान राखून पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कोळी हे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. रविवारी रात्री कोळी आणि पोलिसांचे पथक बाह्यवळण मार्गावर गस्त घालत होते. त्या वेळी वंडरसिटी भागात एका मोटारीजवळ तरुण थांबले होते. ते मोटारीतील डिझेल काढून घेत असल्याचे गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पाहिले.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान

हेही वाचा…पिंपरी हिट अँड रन: पादचारी महिलेला कार चालकाने उडवले; सुदैवाने महिला थोडक्यात बचावली

पोलिसांना पाहताच दोन तरुण घाईगडबडीत मोटारीत शिरले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होते. गस्त घालणाऱ्या पोलिसांची गाडी तेथे आली. पोलीस उपनिरीक्षक कोळी यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. पोलीस येत असल्याचे पाहून चोरट्यांनी मोटार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. उपनिरीक्षक कोळी यांनी प्रसंगावधान राखून चोरट्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. चोरटे नवले पुलाकडे पसार झाले.

Story img Loader