पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रविवारी (२६ फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, गाडे, टपऱ्या आणि सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी काढला आहे. पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी काढलेल्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

कसबा मतदारसंघातील निवडणुकीच्या दृष्टीने १८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. रविवारी मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असेल.

Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद

हेही वाचा – सकाळी काँग्रेसला, संध्याकाळी भाजपा उमेदवाराला पाठिंबा, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसेंचा घूमजाव

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, दत्तवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोटनिवडणूक होत आहे. ७६ मतदान केंद्रांवरील २७० बूथवर मतदान होणार आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता आणि मालमत्तेला धोका पोहोचू नये यासाठी मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, गाडे, टपऱ्या आणि सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नसलेल्या राजकीय व्यक्तीस किंवा राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीस या मतदारसंघात थांबता येणार नाही किंवा वास्तव्य करता येणार नाही.

हेही वाचा – Kasba By Election : “ही लढाई रासने-धंगेकर नव्हे तर..,” कलम ३७० चा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “काश्मीरला…”

………………..

चौकट

विजयी मिरवणुकीवर बंदी

कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) येथील गोदामात २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी गोदामाच्या परिसरातील दोनशे मीटर अंतरात सुरक्षा दल वगळता कोणासही शस्त्र बाळगता येणार नाही. या परिसरात मोबाइल, ध्वनिक्षेपक, वाहने यांच्या वापरावर प्रतिबंध असेल. मतमोजणीच्या परिसरात कोणताही मजकूर लिहिता येणार नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढता येणार नाही, असे आदेश पोलिसांनी काढले आहेत.